• Hindu Jagar
Saturday, August 1, 2026
  • Login
Hindu Jagar | Latest Marathi News Update
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • वर्धा जिल्हा
  • राजकीय
  • देश विदेश
  • क्राईम
  • आरोग्य व शिक्षण
  • तंत्रज्ञान
  • मनोरंजन
    • क्रीडा
  • महाराष्ट्र
    • छ. संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • विदर्भ
  • व्हिडिओ
  • संपादकीय
No Result
View All Result

Home ब्रेकिंग न्यूज

हातात फलक, डोळ्यात अश्रू – दोन वर्षांच्या वेदराजची बाबांसाठी न्यायाची हाक; वर्ध्यात मूक मोर्चा

पुलगावचे उद्योजक भरत नागपाल हत्याकांडातील आरोपींना फाशीची मागणी; तपास सीआयडीकडे देऊन फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवण्याची नागरिकांची मागणी

संपादक - रोशन ठाकूर by संपादक - रोशन ठाकूर
March 6, 2026
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

दैनिक, हिंदू जागर

रोशन ठाकुर, वर्धा

वर्धा : पुलगाव येथील उद्योजक व भाजपाचे पदाधिकारी भरत नागपाल यांच्या निर्घृण हत्येने संतप्त झालेल्या नागरिकांनी वर्धा शहरात मूक विरोध मोर्चा काढून प्रशासनाला धडक दिली. या मोर्चातील सर्वात हृदयद्रावक दृश्य म्हणजे भरत नागपाल यांचा अवघा दोन वर्षांचा मुलगा वेदराज. हातात “माझ्या बाबांच्या खुनींना फाशी द्या” असा फलक आणि डोळ्यात अश्रू घेऊन तो मोर्चात सहभागी झाला होता. चिमुकल्या वेदराजची ही वेदनादायी हाक पाहून उपस्थित नागरिकही भावूक झाले.

चंद्रपूर जिल्ह्यातील बांबर्डा येथील वाळू घाटावर होळीच्या पूर्वसंध्येला कट रचून भरत नागपाल यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात वरोरा पोलिसांनी आतापर्यंत बारा आरोपींना अटक केली असून इतर आरोपींचा शोध अद्याप सुरू आहे. मात्र या घटनेमुळे विदर्भात संतापाची लाट उसळली आहे.

या पार्श्वभूमीवर वर्ध्यातील नामदेव मठ येथून मूक विरोध मोर्चा काढण्यात आला. शहरातील मुख्य मार्गाने निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चेकऱ्यांनी आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात यावा आणि खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून दोषींना कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी ठाम मागणी केली.

या मोर्चात भरत नागपाल यांचे भाऊ दिनेश नागपाल आणि राम नागपाल यांच्यासह कुटुंबीय मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दिनेश नागपाल यांनी प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी करत “आरोपींना तात्काळ शिक्षा झाली पाहिजे, अन्यथा न्यायासाठीचा लढा आणखी तीव्र केला जाईल,” असा इशाराही दिला.

मोर्चात महिलांचीही मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. पंजाबी समाज, मित्रपरिवार आणि विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्तेही भरत नागपाल यांना न्याय मिळावा या मागणीसाठी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते.

दरम्यान, भरत नागपाल यांच्या हत्येचे पडसाद राज्याच्या विधानसभेतही उमटले आहेत. मात्र न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील, असा निर्धार मोर्चेकऱ्यांनी व्यक्त केला. दोन वर्षांच्या वेदराजच्या डोळ्यातील अश्रू आणि बाबांसाठी न्याय मागणारी त्याची हाक मात्र प्रत्येकाच्या मनाला चटका लावून गेली.

Previous Post

सिंदी (रेल्वे) पोलिसांच्या नाकावर टिचून आशिष डंभारेचा वाळू उपसा

Next Post

१८ कोटींची रक्कम न भरता ३०० कोटींची वाळू लुटली? – ब्रम्हपुरीतील १३ घाटांवर बेकायदेशीर उत्खननाचा भीषण घोटाळा; तत्कालीन खनिकर्म अधिकारी रोहन ठवरे व तहसीलदार सतीश मासळ यांच्यावर गंभीर आरोप

संपादक - रोशन ठाकूर

संपादक - रोशन ठाकूर

ठळक बातम्या

एकाच रॉयल्टीवर रेतीचा कथित ‘मल्टिप्लाय’ खेळ?

एकाच रॉयल्टीवर रेतीचा कथित ‘मल्टिप्लाय’ खेळ?

June 13, 2026
गव्हा (समुद्रपूर) येथे रेतीचा डोंगर उभा राहिला, पण प्रशासनाला दिसला नाही? एवढा मोठा साठा जमा करणारा नेमका कोण?

गव्हा (समुद्रपूर) येथे रेतीचा डोंगर उभा राहिला, पण प्रशासनाला दिसला नाही? एवढा मोठा साठा जमा करणारा नेमका कोण?

June 7, 2026

आईच्या घामातून उभी राहिली ‘खाकी’ची शान – गजानन नगरची कु. समीक्षा गिरी मुंबई पोलीस दलात निवड; गरिबीवर जिद्दीचा ऐतिहासिक विजय

May 1, 2026

गांजा माफियांचा खेळ खल्लास – स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; समुद्रपुरात २ आरोपी जेरबंद, १.३४ लाखांचा मुद्देमाल जप्त

April 19, 2026

देशात कायदा आहे की फक्त तमाशा? – वर्ध्यात बजरंग दलाचा संताप उसळला; प्रशासनाला थेट ललकार – महिलांवरील अत्याचार, अतिक्रमण, फसवणूक थांबवा… नाहीतर रस्त्यावर जनता उतरल्याशिवाय राहणार नाही

April 17, 2026

ना पैसा… ना सौदा – फक्त जीव वाचवण्याची जिद्द! काजल रोशन ठाकूर यांची ‘आपुलकी’ आता ॲम्बुलन्सच्या रूपात रस्त्यावर धावणार

April 5, 2026

खाकी वर्दीतील रक्षक की हरामखोर भडवा? रामनगर पोलिस ठाण्यात शिपाई प्रसाद शिंदेवर गंभीर आरोप; तक्रार देण्यासाठी गेलेल्या युवकाला पोटावर बेदम ठोसे, लिव्हर फाटल्याची शक्यता

March 16, 2026

फोनवर एक कोटींची रंगदारी… पण कोर्टात ‘नेटवर्कच नाही!’ – साकेत न्यायालयाचा स्पष्ट निर्णय; कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईसह हरेन सरपदादिया आणि आशीष शर्मा निर्दोष

March 7, 2026
सिंदी (रेल्वे) पोलिसांच्या नाकावर टिचून आशिष डंभारेचा वाळू उपसा

सिंदी (रेल्वे) पोलिसांच्या नाकावर टिचून आशिष डंभारेचा वाळू उपसा

March 5, 2026

वर्ध्यात भाजप पदाधिकाऱ्यांची उघड दहशत! डॉक्टर संकेत रावेकर यांच्यावर रुग्णालयात घुसून हल्ला – कायदा हातात घेऊन गुंडशाहीचा थेट नंगानाच; भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक नेत्यांमुळे आरोग्य यंत्रणा हादरली

March 5, 2026
Next Post

१८ कोटींची रक्कम न भरता ३०० कोटींची वाळू लुटली? - ब्रम्हपुरीतील १३ घाटांवर बेकायदेशीर उत्खननाचा भीषण घोटाळा; तत्कालीन खनिकर्म अधिकारी रोहन ठवरे व तहसीलदार सतीश मासळ यांच्यावर गंभीर आरोप

फोनवर एक कोटींची रंगदारी… पण कोर्टात ‘नेटवर्कच नाही!’ - साकेत न्यायालयाचा स्पष्ट निर्णय; कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईसह हरेन सरपदादिया आणि आशीष शर्मा निर्दोष

खाकी वर्दीतील रक्षक की हरामखोर भडवा? रामनगर पोलिस ठाण्यात शिपाई प्रसाद शिंदेवर गंभीर आरोप; तक्रार देण्यासाठी गेलेल्या युवकाला पोटावर बेदम ठोसे, लिव्हर फाटल्याची शक्यता

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jun    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : वर्धा - 442001 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : dshivsakal@gmail.com

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक : काजल रोशन ठाकुर यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (वर्धा न्यायालया अंतर्गत)
एकाच रॉयल्टीवर रेतीचा कथित ‘मल्टिप्लाय’ खेळ?

एकाच रॉयल्टीवर रेतीचा कथित ‘मल्टिप्लाय’ खेळ?

June 13, 2026

गव्हा (समुद्रपूर) येथे रेतीचा डोंगर उभा राहिला, पण प्रशासनाला दिसला नाही? एवढा मोठा साठा जमा करणारा नेमका कोण?

आईच्या घामातून उभी राहिली ‘खाकी’ची शान – गजानन नगरची कु. समीक्षा गिरी मुंबई पोलीस दलात निवड; गरिबीवर जिद्दीचा ऐतिहासिक विजय

गांजा माफियांचा खेळ खल्लास – स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; समुद्रपुरात २ आरोपी जेरबंद, १.३४ लाखांचा मुद्देमाल जप्त

देशात कायदा आहे की फक्त तमाशा? – वर्ध्यात बजरंग दलाचा संताप उसळला; प्रशासनाला थेट ललकार – महिलांवरील अत्याचार, अतिक्रमण, फसवणूक थांबवा… नाहीतर रस्त्यावर जनता उतरल्याशिवाय राहणार नाही

ना पैसा… ना सौदा – फक्त जीव वाचवण्याची जिद्द! काजल रोशन ठाकूर यांची ‘आपुलकी’ आता ॲम्बुलन्सच्या रूपात रस्त्यावर धावणार

तारखेनुसार बातमी शोधा !

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jun    

वाचक संख्या

Daily Hindu Jagar © 2026 Daily Hindu Jagar Website developed & maintain by Softisky Media Solution. - 9764331134.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • वर्धा जिल्हा
  • राजकीय
  • देश विदेश
  • क्राईम
  • आरोग्य व शिक्षण
  • तंत्रज्ञान
  • मनोरंजन
    • क्रीडा
  • महाराष्ट्र
    • छ. संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • विदर्भ
  • व्हिडिओ
  • संपादकीय

Daily Hindu Jagar © 2026 Daily Hindu Jagar Website developed & maintain by Softisky Media Solution. - 9764331134.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा