• Hindu Jagar
Saturday, August 1, 2026
  • Login
Hindu Jagar | Latest Marathi News Update
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • वर्धा जिल्हा
  • राजकीय
  • देश विदेश
  • क्राईम
  • आरोग्य व शिक्षण
  • तंत्रज्ञान
  • मनोरंजन
    • क्रीडा
  • महाराष्ट्र
    • छ. संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • विदर्भ
  • व्हिडिओ
  • संपादकीय
No Result
View All Result

Home आरोग्य

जिद्द आणि चिकाटीचे फळ; सिंदीचा अक्षय वाघमारे बनला ‘सीए’

२२ लाखांचे पॅकेज सोडून पूर्ण केले स्वप्न

संपादक - रोशन ठाकूर by संपादक - रोशन ठाकूर
March 4, 2026
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

दैनिक, हिंदू जागर
प्रतिनिधी : दिनेश घोडमारे

सिंदी (रेल्वे) : जिद्द आणि कष्टाच्या जोरावर अशक्य वाटणारी गोष्टही साध्य करता येते, हे सिंदी येथील अक्षय सुधाकर वाघमारे याने दाखवून दिले आहे. अत्यंत कठीण मानली जाणारी ‘सीए’ ही परीक्षा उत्तीर्ण होऊन अक्षयने आपल्या वडिलांचे स्वप्न साकार केले असून संपूर्ण परिसरात त्याचे कौतुक होत आहे.
नेहरू विद्यालय, सिंदी येथून शालेय शिक्षण पूर्ण करणाऱ्या अक्षयने १० वी मध्ये ९४% गुण मिळवून आपल्या गुणवत्तेची चुणूक दाखवली होती. डॉक्टर किंवा इंजिनिअर होण्याऐवजी त्याने आव्हानात्मक अशा ‘सीए’ क्षेत्राची निवड केली. सीए परीक्षेचे स्वरूप अत्यंत कठीण असते. यात ५०% गुणांची अनिवार्यता आणि एक विषय राहिल्यास संपूर्ण ग्रुप पुन्हा देण्याच्या अटीमुळे अनेकजण अर्ध्यावरच जिद्द सोडून देतात. अक्षयच्या बाबतीतही शेवटच्या टप्प्यावर दोन वेळा अपयश आले. मात्र, त्याने खचून न जाता मधल्या काळात एम.बी.ए. पूर्ण केले. त्याच्या कौशल्यामुळे त्याला हैदराबाद आणि त्यानंतर बंगलोर येथे २२ लाख रुपयांच्या वार्षिक पॅकेजची नोकरी मिळाली.
बंगलोर येथे मोठ्या पॅकेजवर नोकरी करत असताना अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळत नव्हता. तरीही अक्षयने आपली जिद्द सोडली नाही. व्यावसायिक जबाबदाऱ्या आणि अभ्यासाचा ताळमेळ बसवत त्याने अखेर ‘चार्टर्ड अकाउंटंट’ ही पदवी प्राप्त केली. ओबीसी समाजातील मुले अनेकदा इंजिनिअरिंग किंवा इतर क्षेत्रांकडे वळतात, कारण सीए होण्यासाठी लागणारा वेळ आणि कठीण परीक्षांची त्यांना भीती वाटते. पण कोणत्याही अर्थव्यवस्थेची नाडी म्हणजे सीए असतो. ऑडिटची प्रत्येक विभागात असलेली गरज पाहता या क्षेत्राला मोठी मागणी आहे, असे मत अक्षयच्या वडिलांनी व्यक्त केले. अक्षयचे वडील सुधाकर वाघमारे यांचे स्वतःचे सीए होण्याचे स्वप्न काही अडचणींमुळे अपूर्ण राहिले होते. मात्र, आज त्यांची मुलगी डॉक्टर आणि मुलगा सीए झाल्याने, मुलांच्या माध्यमातून आपले स्वप्न पूर्ण झाल्याचा सार्थ अभिमान त्यांनी व्यक्त केला आहे. अक्षयच्या या यशाने सिंदी शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी तो एक प्रेरणास्थान ठरला आहे.

Previous Post

बामर्ड्यात भरत नागपाल यांची निर्घृण हत्या : ‘तो भाजपचा होता म्हणून बरं झालं’ म्हणणाऱ्या विकृत मेंदूंचा आज समाजासमोर उघडा पर्दाफाश

Next Post

स्व. भरत नागपाल हत्या प्रकरणाने पेटला संताप; न्यायाच्या मागणीसाठी वर्ध्यात ६ मार्चला भव्य मौन मोर्चा

संपादक - रोशन ठाकूर

संपादक - रोशन ठाकूर

ठळक बातम्या

एकाच रॉयल्टीवर रेतीचा कथित ‘मल्टिप्लाय’ खेळ?

एकाच रॉयल्टीवर रेतीचा कथित ‘मल्टिप्लाय’ खेळ?

June 13, 2026
गव्हा (समुद्रपूर) येथे रेतीचा डोंगर उभा राहिला, पण प्रशासनाला दिसला नाही? एवढा मोठा साठा जमा करणारा नेमका कोण?

गव्हा (समुद्रपूर) येथे रेतीचा डोंगर उभा राहिला, पण प्रशासनाला दिसला नाही? एवढा मोठा साठा जमा करणारा नेमका कोण?

June 7, 2026

आईच्या घामातून उभी राहिली ‘खाकी’ची शान – गजानन नगरची कु. समीक्षा गिरी मुंबई पोलीस दलात निवड; गरिबीवर जिद्दीचा ऐतिहासिक विजय

May 1, 2026

गांजा माफियांचा खेळ खल्लास – स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; समुद्रपुरात २ आरोपी जेरबंद, १.३४ लाखांचा मुद्देमाल जप्त

April 19, 2026

देशात कायदा आहे की फक्त तमाशा? – वर्ध्यात बजरंग दलाचा संताप उसळला; प्रशासनाला थेट ललकार – महिलांवरील अत्याचार, अतिक्रमण, फसवणूक थांबवा… नाहीतर रस्त्यावर जनता उतरल्याशिवाय राहणार नाही

April 17, 2026

ना पैसा… ना सौदा – फक्त जीव वाचवण्याची जिद्द! काजल रोशन ठाकूर यांची ‘आपुलकी’ आता ॲम्बुलन्सच्या रूपात रस्त्यावर धावणार

April 5, 2026

खाकी वर्दीतील रक्षक की हरामखोर भडवा? रामनगर पोलिस ठाण्यात शिपाई प्रसाद शिंदेवर गंभीर आरोप; तक्रार देण्यासाठी गेलेल्या युवकाला पोटावर बेदम ठोसे, लिव्हर फाटल्याची शक्यता

March 16, 2026

फोनवर एक कोटींची रंगदारी… पण कोर्टात ‘नेटवर्कच नाही!’ – साकेत न्यायालयाचा स्पष्ट निर्णय; कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईसह हरेन सरपदादिया आणि आशीष शर्मा निर्दोष

March 7, 2026

१८ कोटींची रक्कम न भरता ३०० कोटींची वाळू लुटली? – ब्रम्हपुरीतील १३ घाटांवर बेकायदेशीर उत्खननाचा भीषण घोटाळा; तत्कालीन खनिकर्म अधिकारी रोहन ठवरे व तहसीलदार सतीश मासळ यांच्यावर गंभीर आरोप

March 7, 2026

हातात फलक, डोळ्यात अश्रू – दोन वर्षांच्या वेदराजची बाबांसाठी न्यायाची हाक; वर्ध्यात मूक मोर्चा

March 6, 2026
Next Post

स्व. भरत नागपाल हत्या प्रकरणाने पेटला संताप; न्यायाच्या मागणीसाठी वर्ध्यात ६ मार्चला भव्य मौन मोर्चा

वर्ध्यात भाजप पदाधिकाऱ्यांची उघड दहशत! डॉक्टर संकेत रावेकर यांच्यावर रुग्णालयात घुसून हल्ला - कायदा हातात घेऊन गुंडशाहीचा थेट नंगानाच; भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक नेत्यांमुळे आरोग्य यंत्रणा हादरली

सिंदी (रेल्वे) पोलिसांच्या नाकावर टिचून आशिष डंभारेचा वाळू उपसा

सिंदी (रेल्वे) पोलिसांच्या नाकावर टिचून आशिष डंभारेचा वाळू उपसा

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jun    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : वर्धा - 442001 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : dshivsakal@gmail.com

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक : काजल रोशन ठाकुर यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (वर्धा न्यायालया अंतर्गत)
एकाच रॉयल्टीवर रेतीचा कथित ‘मल्टिप्लाय’ खेळ?

एकाच रॉयल्टीवर रेतीचा कथित ‘मल्टिप्लाय’ खेळ?

June 13, 2026

गव्हा (समुद्रपूर) येथे रेतीचा डोंगर उभा राहिला, पण प्रशासनाला दिसला नाही? एवढा मोठा साठा जमा करणारा नेमका कोण?

आईच्या घामातून उभी राहिली ‘खाकी’ची शान – गजानन नगरची कु. समीक्षा गिरी मुंबई पोलीस दलात निवड; गरिबीवर जिद्दीचा ऐतिहासिक विजय

गांजा माफियांचा खेळ खल्लास – स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; समुद्रपुरात २ आरोपी जेरबंद, १.३४ लाखांचा मुद्देमाल जप्त

देशात कायदा आहे की फक्त तमाशा? – वर्ध्यात बजरंग दलाचा संताप उसळला; प्रशासनाला थेट ललकार – महिलांवरील अत्याचार, अतिक्रमण, फसवणूक थांबवा… नाहीतर रस्त्यावर जनता उतरल्याशिवाय राहणार नाही

ना पैसा… ना सौदा – फक्त जीव वाचवण्याची जिद्द! काजल रोशन ठाकूर यांची ‘आपुलकी’ आता ॲम्बुलन्सच्या रूपात रस्त्यावर धावणार

तारखेनुसार बातमी शोधा !

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jun    

वाचक संख्या

Daily Hindu Jagar © 2026 Daily Hindu Jagar Website developed & maintain by Softisky Media Solution. - 9764331134.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • वर्धा जिल्हा
  • राजकीय
  • देश विदेश
  • क्राईम
  • आरोग्य व शिक्षण
  • तंत्रज्ञान
  • मनोरंजन
    • क्रीडा
  • महाराष्ट्र
    • छ. संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • विदर्भ
  • व्हिडिओ
  • संपादकीय

Daily Hindu Jagar © 2026 Daily Hindu Jagar Website developed & maintain by Softisky Media Solution. - 9764331134.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा