• Hindu Jagar
Tuesday, September 15, 2026
  • Login
Hindu Jagar | Latest Marathi News Update
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • वर्धा जिल्हा
  • राजकीय
  • देश विदेश
  • क्राईम
  • आरोग्य व शिक्षण
  • तंत्रज्ञान
  • मनोरंजन
    • क्रीडा
  • महाराष्ट्र
    • छ. संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • विदर्भ
  • व्हिडिओ
  • संपादकीय
No Result
View All Result

Home आरोग्य

बामर्ड्यात भरत नागपाल यांची निर्घृण हत्या : ‘तो भाजपचा होता म्हणून बरं झालं’ म्हणणाऱ्या विकृत मेंदूंचा आज समाजासमोर उघडा पर्दाफाश

हत्या करणाऱ्यांपेक्षा अधिक घातक ठरत आहेत सोशल मीडियावर बसून खून योग्य ठरवणारे ,माणुसकीचा कत्तलखाना बनतोय समाज

संपादक - रोशन ठाकूर by संपादक - रोशन ठाकूर
March 4, 2026
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

दैनिक, हिंदू जागर |  विशेष  रिपोर्ट
मुख्य संपादक : रोशन ठाकुर, वर्धा

वर्धा : भरत नागपाल यांच्या निर्घृण हत्येने संपूर्ण परिसर हादरलेला असतानाच, या घटनेनंतर समाजमाध्यमांवर सुरू झालेला विकृत जल्लोष हा केवळ संतापजनक नसून, संपूर्ण समाजाला हिंसेकडे ढकलणारा अत्यंत धोकादायक प्रवाह ठरत आहे. “जे झालं ते बरं झालं”, “एक कमी झाला”, “तो भाजपवाला होता म्हणून मेला”, अशा थेट आणि निर्लज्ज शब्दांत काही लोक खुलेआम हत्येचं समर्थन करत आहेत.

हा फक्त शब्दांचा खेळ नाही हा माणुसकीच्या मरणाचा जल्लोष आहे.

आज भरत नागपाल यांच्या हत्येवर काही जण स्वतःला मोठे विचारवंत, निर्भीड आणि प्रखर राजकीय कार्यकर्ते समजून उघडपणे आनंद व्यक्त करत आहेत. पण वास्तवात हे लोक हत्येचे अप्रत्यक्ष भागीदार बनत चालले आहेत, याची त्यांना जाणीवही नाही.

कारण आज खून कुणाचा झाला, हा मुद्दा दुय्यम बनवून, “तो कोणत्या पक्षाचा होता” हा मुद्दा केंद्रस्थानी आणला जात आहे.

या प्रकरणात काही जण जाणीवपूर्वक भरत नागपाल यांची ओळख थेट भारतीय जनता पार्टी शी जोडून, त्यांच्या मृत्यूला जणू राजकीय विजय ठरवत आहेत. उद्या काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी किंवा अन्य पक्षाचा कार्यकर्ता मारला गेला, तर त्याच्यावरही असाच जल्लोष होणार का? मग गुन्हेगार आणि सोशल मीडियावरून खून योग्य ठरवणारे यांच्यात नेमका फरक काय?

आज बामर्ड्यात केवळ एका व्यक्तीचा खून झालेला नाही, तर एका कुटुंबाचं आयुष्य कायमचं उद्ध्वस्त झालं आहे.

त्या आईचा काय दोष, जिने आपल्या कर्तबगार मुलाच्या भविष्यासाठी आयुष्य घालवलं? त्या भावाचं काय, जो लक्ष्मणासारखा आयुष्यभर भावाच्या पाठीशी उभा राहणार होता? त्या पत्नीचं काय, जिचा संपूर्ण संसार एका क्षणात राख झाला? आणि त्या गोड, निष्पाप लहान मुलांचं काय, ज्यांना आता आयुष्यभर “बिनबापाचे” म्हणून ओळखलं जाणार आहे?

हे सगळे प्रश्न कुणालाच महत्त्वाचे वाटत नाहीत का?

फेसबुक, व्हॉट्सॲप आणि इतर माध्यमांवर बसून काही लोक निर्लज्जपणे लिहित आहेत. “तो अमुक पक्षाचा होता, म्हणून बरं झालं.” हा विचार केवळ राजकीय द्वेषाचा नाही, तर थेट हिंसेला वैध ठरवणारा विचार आहे.

आज जर एखाद्याचा खून त्याच्या राजकीय ओळखीवरून योग्य ठरवला जात असेल, तर उद्या जात, धर्म, भाषा किंवा विचारधारेवरून लोकांना संपवण्याची मानसिकता तयार होण्यासाठी किती वेळ लागणार आहे?

समाजाने हे गंभीरपणे ओळखलं पाहिजे

आज हत्येचा निषेध करण्याऐवजी, काही लोक आरोपी शोधण्याऐवजी, मृत व्यक्तीचा राजकीय शिक्का शोधण्यात मश्गूल आहेत. हेच तर सर्वात भीषण वास्तव आहे.

भरत नागपाल हे केवळ “भाजपचे नाव” नव्हते. ते एका आईचे जग होते, एका पत्नीचा आधार होते, एका भावाचे बळ होते आणि दोन लहान मुलांचे संपूर्ण विश्व होते. त्यांचा मृत्यू म्हणजे एखाद्या पक्षाचं नुकसान नव्हे तो एका कुटुंबाच्या आयुष्याचा कायमचा शेवट आहे.

आज हत्येच्या समर्थनार्थ लिहिल्या जाणाऱ्या प्रत्येक कॉमेंटमागे एक विकृत समाधान दडलेलं आहे. पण त्या एका ओळीमुळे त्या कुटुंबाच्या जखमेवर मीठ चोळलं जातं, याची जाणीव या तथाकथित विचारवंतांना नाही.

आज समाजाला कठोरपणे ठरवावं लागेल आपल्याला गुन्हेगारांच्या बाजूने उभं राहायचं आहे की पीडित कुटुंबाच्या?

आज दोषींना अटक झाली पाहिजे, त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई झालीच पाहिजे. पण त्याचबरोबर, हत्येचं समर्थन करणाऱ्या या विकृत मानसिकतेलाही समाजाने ठाम नकार दिला पाहिजे.

कारण आज भरत नागपाल गेले… उद्या कोण?

हा प्रश्न आता फक्त बामर्ड्याचा राहिलेला नाही तो संपूर्ण समाजाच्या सुरक्षिततेचा आणि माणुसकीच्या अस्तित्वाचा प्रश्न बनला आहे.

Previous Post

सिंदी (रेल्वे) नगरपरिषदेत ‘ठिणगी’! जनहिताच्या मुद्द्यांवरून नगरसेविका जयश्री मडावी आक्रमक

Next Post

जिद्द आणि चिकाटीचे फळ; सिंदीचा अक्षय वाघमारे बनला ‘सीए’

संपादक - रोशन ठाकूर

संपादक - रोशन ठाकूर

ठळक बातम्या

ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्याआड नितेश कराळेंचा आवाज दाबण्याचा खेळ तर नाही ना?

ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्याआड नितेश कराळेंचा आवाज दाबण्याचा खेळ तर नाही ना?

August 28, 2026
झाडांवर खुलेआम कुऱ्हाड; बीएसएनएल अधिकारी अनभिज्ञ, वनविभागही मूकदर्शक – सेलूत नेमका झाडतोड खेळ कुणाचा? परवानगी होती तरी कुठे? तोडलेले लाकूड गेले कुठे? चौकशीच्या फेऱ्यात बीएसएनएल-वनविभागाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न

August 22, 2026
Private: १२ जानेवारी की १२ सप्टेंबर? एका मुलीच्या दोन जन्मतारखांनी बालविवाह प्रकरणात खळबळ? ओरिजिनल शाळेचा दाखला, बोर्ड सर्टिफिकेट अन् आधारवर १२ जानेवारी २००८; त्यानुसार मुलीचे वय १८ वर्षे ७ महिने पूर्ण – मात्र जन्मदाखल्यावर १२ सप्टेंबर २००८; मग रोशन ठाकुर आरोपी आणि कागदपत्रे तयार करणारे मोकाट का? एकच मुलगी, दोन जन्मतारखा; कायद्याच्या कचाट्यात नेमकं कोण?

१२ जानेवारी की १२ सप्टेंबर? एका मुलीच्या दोन जन्मतारखांनी बालविवाह प्रकरणात खळबळ? ओरिजिनल शाळेचा दाखला, बोर्ड सर्टिफिकेट अन् आधारवर १२ जानेवारी २००८; त्यानुसार मुलीचे वय १८ वर्षे ७ महिने पूर्ण – मात्र जन्मदाखल्यावर १२ सप्टेंबर २००८; मग रोशन ठाकुर आरोपी आणि कागदपत्रे तयार करणारे मोकाट का? एकच मुलगी, दोन जन्मतारखा; कायद्याच्या कचाट्यात नेमकं कोण?

August 21, 2026
एकाच रॉयल्टीवर रेतीचा कथित ‘मल्टिप्लाय’ खेळ?

एकाच रॉयल्टीवर रेतीचा कथित ‘मल्टिप्लाय’ खेळ?

June 13, 2026
गव्हा (समुद्रपूर) येथे रेतीचा डोंगर उभा राहिला, पण प्रशासनाला दिसला नाही? एवढा मोठा साठा जमा करणारा नेमका कोण?

गव्हा (समुद्रपूर) येथे रेतीचा डोंगर उभा राहिला, पण प्रशासनाला दिसला नाही? एवढा मोठा साठा जमा करणारा नेमका कोण?

June 7, 2026

आईच्या घामातून उभी राहिली ‘खाकी’ची शान – गजानन नगरची कु. समीक्षा गिरी मुंबई पोलीस दलात निवड; गरिबीवर जिद्दीचा ऐतिहासिक विजय

May 1, 2026

गांजा माफियांचा खेळ खल्लास – स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; समुद्रपुरात २ आरोपी जेरबंद, १.३४ लाखांचा मुद्देमाल जप्त

April 19, 2026

देशात कायदा आहे की फक्त तमाशा? – वर्ध्यात बजरंग दलाचा संताप उसळला; प्रशासनाला थेट ललकार – महिलांवरील अत्याचार, अतिक्रमण, फसवणूक थांबवा… नाहीतर रस्त्यावर जनता उतरल्याशिवाय राहणार नाही

April 17, 2026

ना पैसा… ना सौदा – फक्त जीव वाचवण्याची जिद्द! काजल रोशन ठाकूर यांची ‘आपुलकी’ आता ॲम्बुलन्सच्या रूपात रस्त्यावर धावणार

April 5, 2026

खाकी वर्दीतील रक्षक की हरामखोर भडवा? रामनगर पोलिस ठाण्यात शिपाई प्रसाद शिंदेवर गंभीर आरोप; तक्रार देण्यासाठी गेलेल्या युवकाला पोटावर बेदम ठोसे, लिव्हर फाटल्याची शक्यता

March 16, 2026
Next Post
जिद्द आणि चिकाटीचे फळ; सिंदीचा अक्षय वाघमारे बनला ‘सीए’

जिद्द आणि चिकाटीचे फळ; सिंदीचा अक्षय वाघमारे बनला 'सीए'

स्व. भरत नागपाल हत्या प्रकरणाने पेटला संताप; न्यायाच्या मागणीसाठी वर्ध्यात ६ मार्चला भव्य मौन मोर्चा

वर्ध्यात भाजप पदाधिकाऱ्यांची उघड दहशत! डॉक्टर संकेत रावेकर यांच्यावर रुग्णालयात घुसून हल्ला - कायदा हातात घेऊन गुंडशाहीचा थेट नंगानाच; भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक नेत्यांमुळे आरोग्य यंत्रणा हादरली

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : वर्धा - 442001 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : dshivsakal@gmail.com

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक : काजल रोशन ठाकुर यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (वर्धा न्यायालया अंतर्गत)
ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्याआड नितेश कराळेंचा आवाज दाबण्याचा खेळ तर नाही ना?

ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्याआड नितेश कराळेंचा आवाज दाबण्याचा खेळ तर नाही ना?

August 28, 2026

झाडांवर खुलेआम कुऱ्हाड; बीएसएनएल अधिकारी अनभिज्ञ, वनविभागही मूकदर्शक – सेलूत नेमका झाडतोड खेळ कुणाचा? परवानगी होती तरी कुठे? तोडलेले लाकूड गेले कुठे? चौकशीच्या फेऱ्यात बीएसएनएल-वनविभागाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न

१२ जानेवारी की १२ सप्टेंबर? एका मुलीच्या दोन जन्मतारखांनी बालविवाह प्रकरणात खळबळ? ओरिजिनल शाळेचा दाखला, बोर्ड सर्टिफिकेट अन् आधारवर १२ जानेवारी २००८; त्यानुसार मुलीचे वय १८ वर्षे ७ महिने पूर्ण – मात्र जन्मदाखल्यावर १२ सप्टेंबर २००८; मग रोशन ठाकुर आरोपी आणि कागदपत्रे तयार करणारे मोकाट का? एकच मुलगी, दोन जन्मतारखा; कायद्याच्या कचाट्यात नेमकं कोण?

एकाच रॉयल्टीवर रेतीचा कथित ‘मल्टिप्लाय’ खेळ?

गव्हा (समुद्रपूर) येथे रेतीचा डोंगर उभा राहिला, पण प्रशासनाला दिसला नाही? एवढा मोठा साठा जमा करणारा नेमका कोण?

आईच्या घामातून उभी राहिली ‘खाकी’ची शान – गजानन नगरची कु. समीक्षा गिरी मुंबई पोलीस दलात निवड; गरिबीवर जिद्दीचा ऐतिहासिक विजय

तारखेनुसार बातमी शोधा !

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

वाचक संख्या

Daily Hindu Jagar © 2026 Daily Hindu Jagar Website developed & maintain by Softisky Media Solution. - 9764331134.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • वर्धा जिल्हा
  • राजकीय
  • देश विदेश
  • क्राईम
  • आरोग्य व शिक्षण
  • तंत्रज्ञान
  • मनोरंजन
    • क्रीडा
  • महाराष्ट्र
    • छ. संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • विदर्भ
  • व्हिडिओ
  • संपादकीय

Daily Hindu Jagar © 2026 Daily Hindu Jagar Website developed & maintain by Softisky Media Solution. - 9764331134.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा