

मिळालेल्या माहितीनुसार, आशिष डंभारे याने रेती चोरीसाठी एक मजबूत नेटवर्क तयार केले आहे. उत्खनन सुरू असताना सिंदी ते हत्तीगोटा मार्गावर त्याचे साथीदार जागोजागी उभे राहून ‘वॉच’ ठेवतात. प्रशासकीय हालचाल किंवा संशयास्पद वाहन दिसताच मोबाईलद्वारे एकमेकांना सूचना देऊन रेतीची वाहने गायब केली जातात. एखाद्या चित्रपटात शोभावं असं हे ‘नेटवर्क’ पोलिसांच्या डोळ्यासमोर कार्यरत असताना पोलीस ढिम्म का? असा सवाल उपस्थित होत आहे.
मागील कित्येक वर्षांपासून डंभारे हा रेतीची तस्करी करत आहे. परिसरातील नागरिकांनी अनेकदा याकडे लक्ष वेधले, मात्र ‘अर्थपूर्ण’ संबंधांमुळे कारवाईची फाईल दाबण्यात येत असल्याचा संशय व्यक्त होत आहे. वणा नदीचे पात्र अवैध उत्खननामुळे धोक्यात आले असून, पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. जर सर्वसामान्य माणसाने एखादी चूक केली तर कायदा तत्परतेने काम करतो, मग वर्षानुवर्षे शासनाचा महसूल बुडवणाऱ्या डंभारेवर सिंदी पोलीस मेहेरबान का?Hindu Jagar © 2026 Daily Hindu Jagar Website developed & maintain by Softisky Media Solution. - 9764331134.
Hindu Jagar © 2026 Daily Hindu Jagar Website developed & maintain by Softisky Media Solution. - 9764331134.