• Hindu Jagar
Tuesday, September 15, 2026
  • Login
Hindu Jagar | Latest Marathi News Update
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • वर्धा जिल्हा
  • राजकीय
  • देश विदेश
  • क्राईम
  • आरोग्य व शिक्षण
  • तंत्रज्ञान
  • मनोरंजन
    • क्रीडा
  • महाराष्ट्र
    • छ. संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • विदर्भ
  • व्हिडिओ
  • संपादकीय
No Result
View All Result

Home ब्रेकिंग न्यूज

ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्याआड नितेश कराळेंचा आवाज दाबण्याचा खेळ तर नाही ना?

संपादक - रोशन ठाकूर by संपादक - रोशन ठाकूर
August 28, 2026
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

सत्तेला जाब विचारणाऱ्या नितेश कराळेंना अटक; ३५(३) ची नोटीस कुठे? पोलिसांची कोठडीची मागणी न्यायालयाने फेटाळली

नितेश कराळे गप्प झाले पाहिजेत, अशी कुणाची इच्छा? कारवाई झाली; पण आवाज दाबला जाईल का?

दैनिक, हिंदू जागर | रोशन ठाकुर, वर्धा

वर्धा : महागाई, भ्रष्टाचार, प्रशासनातील गैरप्रकार, विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि सर्वसामान्यांच्या अडचणींवर सातत्याने आवाज उठविणारे नितेश बाळकृष्ण कराळे यांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत दाखल अपराध क्रमांक १३५९/२०२६ प्रकरणात अटक करण्यात आली. मात्र पोलिसांनी मागितलेली पोलीस कोठडीची मागणी न्यायालयाने फेटाळून लावत त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे या प्रकरणातील अटकेच्या प्रक्रियेवरच आता प्रश्न उपस्थित होत आहेत.

२० ऑगस्ट २०२६ रोजी रात्री १.११ वाजता वर्धा शहर पोलीस ठाण्यात सदर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर २६ ऑगस्ट रोजी रात्री १२ वाजता नितेश कराळे यांना ताब्यात घेण्यात आले. २७ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता त्यांना जिल्हा व सत्र न्यायालय, वर्धा येथे हजर करण्यात आले. यावेळी पोलिसांनी तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी केली.

बचाव पक्षाने अटकेच्या प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित केला. भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम ३५(३) अंतर्गत नोटीस देण्यात आली होती का? नोटीस न देता थेट अटक का करण्यात आली? असा मुद्दा न्यायालयासमोर मांडण्यात आला.

केवळ अटकेची कारणे नोंदविणे हे कलम ३५(३) अंतर्गत नोटीस देण्याच्या प्रक्रियेचा पर्याय ठरू शकत नाही, असा युक्तिवाद बचाव पक्षाने केला. अटक ही व्यक्तिस्वातंत्र्यावर परिणाम करणारी गंभीर कारवाई असल्याने कायद्याने निर्धारित केलेल्या प्रक्रियेचे काटेकोर पालन आवश्यक असल्याचेही न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.

बचाव पक्षाने सर्वोच्च न्यायालयाच्या सतेंद्र कुमार अंतिल तसेच अर्णेश कुमार प्रकरणांतील निर्णयांचा आधार घेतला. या युक्तिवादानंतर न्यायालयाने पोलिसांची पोलीस कोठडीची मागणी फेटाळून नितेश कराळे यांना न्यायालयीन कोठडी सुनावली.

मात्र या न्यायालयीन घडामोडीनंतर प्रश्न केवळ अटकेपुरता राहिलेला नाही.

नितेश कराळे हे महागाई, भ्रष्टाचार, प्रशासनातील गैरप्रकार, विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि सर्वसामान्यांच्या अडचणींवर सातत्याने आवाज उठवत असल्याचे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. आंदोलनांच्या माध्यमातून प्रश्न मांडणे तसेच समाजमाध्यमांवरील व्हिडिओच्या माध्यमातून जनजागृती करणे, अशी त्यांची भूमिका राहिली आहे.

मग सत्तेला जाब विचारणारा हाच आवाज कुणाला खटकतोय का? गुन्हा दाखल करून किंवा कायदेशीर कारवाईच्या माध्यमातून नितेश कराळेंचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे का? असा सवाल त्यांच्या समर्थकांकडून उपस्थित केला जात आहे.

द्वेष, आकस किंवा राजकीय दबावातून नितेश कराळे यांना या प्रकरणात गोवले जात असल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जात असला, तरी या कथित राजकीय हेतूबाबत अद्याप कोणताही अंतिम न्यायालयीन निष्कर्ष झालेला नाही.

नितेश कराळे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे; मात्र गुन्हा दाखल होणे म्हणजे दोष सिद्ध होणे नव्हे. प्रकरण न्यायालयीन प्रक्रियेत असून अंतिम सत्य न्यायालयीन निर्णयातूनच स्पष्ट होणार आहे.

दैनिक हिंदू जागरची भूमिकाही स्पष्ट आहे. दैनिक हिंदू जागर कोणत्याही समाजाच्या भावना दुखावणाऱ्या वक्तव्याचे समर्थन करत नाही आणि भविष्यातही करणार नाही. नितेश कराळे यांच्याकडून कोणतेही चुकीचे किंवा समाजाच्या भावना दुखावणारे वक्तव्य झाले असेल, तर त्याचे समर्थन दैनिक हिंदू जागर करणार नाही.

मात्र अन्यायाविरुद्ध आवाज उठविणाऱ्या व्यक्तीवर कारवाई होत असेल, तर त्या कारवाईची कायदेशीरता आणि प्रक्रिया तपासलीच पाहिजे. दैनिक हिंदू जागर नेहमी सत्याच्या बाजूने उभा राहिला आहे आणि नितेश कराळे यांच्यावर अन्याय होत असल्याचे स्पष्ट झाल्यास त्यांच्या बाजूने ठामपणे आवाज उठवत राहणार आहे.

चूक असेल तर विरोध; अन्याय असेल तर आवाज – हीच दैनिक हिंदू जागरची भूमिका

या प्रकरणात विरोधी राजकीय नेत्यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. नितेश कराळे यांनी विरोधी राजकीय शक्तींच्या विविध प्रश्नांवरही आवाज उठविला. मग आज त्यांच्या अडचणीच्या काळात विरोधी पक्षातील नेते त्यांच्या पाठीशी ठामपणे का उभे राहत नाहीत? निवडणुकीच्या वेळी नितेश कराळे हवेत; मग संकटाच्या वेळी त्यांचा आवाज एकटाच का? असा सवाल समर्थकांकडून केला जात आहे.

आज नितेश कराळे आणि त्यांच्या परिवारावर काय परिस्थिती आहे, याची जाणीव त्यांनाच आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणाने एक मोठा प्रश्न जनतेसमोर ठेवला आहे. नितेश कराळेंवर गुन्हा दाखल झाला, अटक झाली, पोलिसांनी कोठडी मागितली आणि न्यायालयाने ती फेटाळली. तरीही नितेश कराळे यांनी उपस्थित केलेले प्रश्न मात्र आजही जनतेसमोर आहेत. म्हणूनच शेवटचा प्रश्न अधिक मोठा आहे – नितेश कराळेंना गप्प करण्याचा प्रयत्न झाला असेल, तर त्यांच्या आवाजाला अटक होणार तरी कशी? कारण व्यक्तीला कोठडी मिळू शकते; पण जनतेच्या प्रश्नांना कोठडीत बंद करता येत नाही.

आता या प्रकरणात कायदेशीर प्रक्रिया पुढे काय वळण घेते, याकडे वर्ध्याचेच नव्हे तर संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Previous Post

झाडांवर खुलेआम कुऱ्हाड; बीएसएनएल अधिकारी अनभिज्ञ, वनविभागही मूकदर्शक – सेलूत नेमका झाडतोड खेळ कुणाचा? परवानगी होती तरी कुठे? तोडलेले लाकूड गेले कुठे? चौकशीच्या फेऱ्यात बीएसएनएल-वनविभागाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न

संपादक - रोशन ठाकूर

संपादक - रोशन ठाकूर

ठळक बातम्या

झाडांवर खुलेआम कुऱ्हाड; बीएसएनएल अधिकारी अनभिज्ञ, वनविभागही मूकदर्शक – सेलूत नेमका झाडतोड खेळ कुणाचा? परवानगी होती तरी कुठे? तोडलेले लाकूड गेले कुठे? चौकशीच्या फेऱ्यात बीएसएनएल-वनविभागाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न

झाडांवर खुलेआम कुऱ्हाड; बीएसएनएल अधिकारी अनभिज्ञ, वनविभागही मूकदर्शक – सेलूत नेमका झाडतोड खेळ कुणाचा? परवानगी होती तरी कुठे? तोडलेले लाकूड गेले कुठे? चौकशीच्या फेऱ्यात बीएसएनएल-वनविभागाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न

August 22, 2026
Private: १२ जानेवारी की १२ सप्टेंबर? एका मुलीच्या दोन जन्मतारखांनी बालविवाह प्रकरणात खळबळ? ओरिजिनल शाळेचा दाखला, बोर्ड सर्टिफिकेट अन् आधारवर १२ जानेवारी २००८; त्यानुसार मुलीचे वय १८ वर्षे ७ महिने पूर्ण – मात्र जन्मदाखल्यावर १२ सप्टेंबर २००८; मग रोशन ठाकुर आरोपी आणि कागदपत्रे तयार करणारे मोकाट का? एकच मुलगी, दोन जन्मतारखा; कायद्याच्या कचाट्यात नेमकं कोण?

१२ जानेवारी की १२ सप्टेंबर? एका मुलीच्या दोन जन्मतारखांनी बालविवाह प्रकरणात खळबळ? ओरिजिनल शाळेचा दाखला, बोर्ड सर्टिफिकेट अन् आधारवर १२ जानेवारी २००८; त्यानुसार मुलीचे वय १८ वर्षे ७ महिने पूर्ण – मात्र जन्मदाखल्यावर १२ सप्टेंबर २००८; मग रोशन ठाकुर आरोपी आणि कागदपत्रे तयार करणारे मोकाट का? एकच मुलगी, दोन जन्मतारखा; कायद्याच्या कचाट्यात नेमकं कोण?

August 21, 2026
एकाच रॉयल्टीवर रेतीचा कथित ‘मल्टिप्लाय’ खेळ?

एकाच रॉयल्टीवर रेतीचा कथित ‘मल्टिप्लाय’ खेळ?

June 13, 2026
गव्हा (समुद्रपूर) येथे रेतीचा डोंगर उभा राहिला, पण प्रशासनाला दिसला नाही? एवढा मोठा साठा जमा करणारा नेमका कोण?

गव्हा (समुद्रपूर) येथे रेतीचा डोंगर उभा राहिला, पण प्रशासनाला दिसला नाही? एवढा मोठा साठा जमा करणारा नेमका कोण?

June 7, 2026

आईच्या घामातून उभी राहिली ‘खाकी’ची शान – गजानन नगरची कु. समीक्षा गिरी मुंबई पोलीस दलात निवड; गरिबीवर जिद्दीचा ऐतिहासिक विजय

May 1, 2026

गांजा माफियांचा खेळ खल्लास – स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; समुद्रपुरात २ आरोपी जेरबंद, १.३४ लाखांचा मुद्देमाल जप्त

April 19, 2026

देशात कायदा आहे की फक्त तमाशा? – वर्ध्यात बजरंग दलाचा संताप उसळला; प्रशासनाला थेट ललकार – महिलांवरील अत्याचार, अतिक्रमण, फसवणूक थांबवा… नाहीतर रस्त्यावर जनता उतरल्याशिवाय राहणार नाही

April 17, 2026

ना पैसा… ना सौदा – फक्त जीव वाचवण्याची जिद्द! काजल रोशन ठाकूर यांची ‘आपुलकी’ आता ॲम्बुलन्सच्या रूपात रस्त्यावर धावणार

April 5, 2026

खाकी वर्दीतील रक्षक की हरामखोर भडवा? रामनगर पोलिस ठाण्यात शिपाई प्रसाद शिंदेवर गंभीर आरोप; तक्रार देण्यासाठी गेलेल्या युवकाला पोटावर बेदम ठोसे, लिव्हर फाटल्याची शक्यता

March 16, 2026

फोनवर एक कोटींची रंगदारी… पण कोर्टात ‘नेटवर्कच नाही!’ – साकेत न्यायालयाचा स्पष्ट निर्णय; कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईसह हरेन सरपदादिया आणि आशीष शर्मा निर्दोष

March 7, 2026

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : वर्धा - 442001 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : dshivsakal@gmail.com

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक : काजल रोशन ठाकुर यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (वर्धा न्यायालया अंतर्गत)
ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्याआड नितेश कराळेंचा आवाज दाबण्याचा खेळ तर नाही ना?

ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्याआड नितेश कराळेंचा आवाज दाबण्याचा खेळ तर नाही ना?

August 28, 2026

झाडांवर खुलेआम कुऱ्हाड; बीएसएनएल अधिकारी अनभिज्ञ, वनविभागही मूकदर्शक – सेलूत नेमका झाडतोड खेळ कुणाचा? परवानगी होती तरी कुठे? तोडलेले लाकूड गेले कुठे? चौकशीच्या फेऱ्यात बीएसएनएल-वनविभागाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न

१२ जानेवारी की १२ सप्टेंबर? एका मुलीच्या दोन जन्मतारखांनी बालविवाह प्रकरणात खळबळ? ओरिजिनल शाळेचा दाखला, बोर्ड सर्टिफिकेट अन् आधारवर १२ जानेवारी २००८; त्यानुसार मुलीचे वय १८ वर्षे ७ महिने पूर्ण – मात्र जन्मदाखल्यावर १२ सप्टेंबर २००८; मग रोशन ठाकुर आरोपी आणि कागदपत्रे तयार करणारे मोकाट का? एकच मुलगी, दोन जन्मतारखा; कायद्याच्या कचाट्यात नेमकं कोण?

एकाच रॉयल्टीवर रेतीचा कथित ‘मल्टिप्लाय’ खेळ?

गव्हा (समुद्रपूर) येथे रेतीचा डोंगर उभा राहिला, पण प्रशासनाला दिसला नाही? एवढा मोठा साठा जमा करणारा नेमका कोण?

आईच्या घामातून उभी राहिली ‘खाकी’ची शान – गजानन नगरची कु. समीक्षा गिरी मुंबई पोलीस दलात निवड; गरिबीवर जिद्दीचा ऐतिहासिक विजय

तारखेनुसार बातमी शोधा !

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

वाचक संख्या

Daily Hindu Jagar © 2026 Daily Hindu Jagar Website developed & maintain by Softisky Media Solution. - 9764331134.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • वर्धा जिल्हा
  • राजकीय
  • देश विदेश
  • क्राईम
  • आरोग्य व शिक्षण
  • तंत्रज्ञान
  • मनोरंजन
    • क्रीडा
  • महाराष्ट्र
    • छ. संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • विदर्भ
  • व्हिडिओ
  • संपादकीय

Daily Hindu Jagar © 2026 Daily Hindu Jagar Website developed & maintain by Softisky Media Solution. - 9764331134.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा