मनोरंजन

वर्ध्यात भरधाव टिप्परची स्कूटीला धडक, 15 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू; एकाची मृत्यूशी झुंज सुरु

 

मुख्य संपादक : रोशन ठाकुर

दैनिक, हिंदू जागर

वर्धा : शहरातील भगतसिंग चौक येथे गिट्टी घेऊन येत असलेल्या टिप्परची स्कूटीला धडक लागली. यात टिप्परमध्ये समोरून ही स्कूटी बाईक टिप्परच्या समोरच्या भागात शिरली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी झाला असून त्याला सावंगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गंभीर जखमी झालेल्या युवकाची मृत्यूशी झुंज सुरू असल्याची माहिती आहे.

मृतक बालकाचे नाव आयुष संजू मांडवे असं असून तो सावंगी टी पॉईंट परिसरात राहणारा आहे. 15 वर्षाचे वय असून त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर जखमी निखिल प्रफुल मांडवे हा 15 वर्षाचा असून तो द्वारका नगर सावंगी मेघे येथे राहणारा आहे. अपघातात दोन्ही पायाला जबर मार लागला आहे. त्याची सावंगी रुग्णालयात मृत्युंशी झुंज सुरू आहे. अपघात घडताच भगतसिंग चौकात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. राम नगर पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी टिप्पर जप्त केला असून तपास सुरू आहे.

 

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या वेबसाईटवरील बातम्या,लेख,फोटो तसेच ईतर साहित्य मुख्य संपादक यांच्या परवानगी शिवाय कॉपी करू नये