
संपादक : रोशन ठाकुर
वर्धा : भारतीय जनता पार्टीच्या युवा आघाडीची (भाजयुमो) नविन कार्यकारिणी निवडण्यात आली. त्यात नविन चेहऱ्याला संधी देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वर्धा जिल्हा पालकमंत्री व राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, राज्याचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर यांच्या मान्यतेने जिल्हाध्यक्ष संजय गाते यांनी जिल्हा कार्यकारिणी घोषित केली. त्यामध्ये वर्धा जिल्हाध्यक्षपदी पृथ्वीराज शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पक्षाच्या संघटनेमध्ये सक्रिय सहभाग व नेतृत्वगुण लक्षात घेता पृथ्वीराज शिंदे यांच्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
त्यांच्या नेतृत्वाखाली वर्धा जिल्ह्यात भाजपाच्या युवा कार्याला नविन दिशा मिळेल. असा विश्वास पक्षातील वरिष्ठानी व्यक्त केला आहे.